जन्मोजन्मींचे संचित
1827.
जन्मोजन्मींचे संचित । गुरुपायीं जडले चित्त ॥१॥
तेंतो सोडिल्या न सुटे । प्रेमतंतु तो न तुटे ॥२॥
दुःखे आदळलीं वरपडा । पाय न सोडी हा धडा ॥३॥
देह गेला तरी जावो । गुरुचरणी दृढ भावो ॥४॥
वरी पडोन पाषाण । परी न सोडी गुरुचरण ॥५॥
एका जनार्दनी निर्धार । तेथे प्रगटे विश्वंभर ॥६॥
