अठ्ठावीस युगे उभा चं
1824.
अठ्ठावीस युगे उभा चंद्रभागे | परी पालटची नेघे पांडुरंग ॥१॥
उभा उगेपणे पुंडलिकाचेनी सुखे | आहे तेथे लक्ष जैसा तैसा ॥२॥
प्रेम रसरंगे प्रीतीचेनी पांगे | सदा संतसंगे खेळ करी ॥३॥
जो नलभे योगे यागे आणि देहत्यागे | तो सांपडला सर्वांगे हृदयी धरा ॥४॥
धुंडाळता श्रुतिस्मृति जो नुमगे | तो भक्ता साहे मार्गे सांभाळित ॥५॥
योगियांच्या ध्यानी क्षणएक न रंगे | तो सुखी गोष्टी सांगे नामयासी ॥६॥
