दृष्टी देखे परब्रह्म
1803.
दृष्टी देखे परब्रह्मा । श्रवनीं ऐके परब्रह्मा ॥१॥
रसना सेवी ब्रह्मारस । सदा आनंद उल्हास ॥२॥
गुरुकृपेचे हे वर्म । जग देखे परब्रह्मा ॥३॥
एका जनार्दनी चराचर । अवघे ज्यासी परात्पर ॥४॥