निद्रीस्ताचे शेजे सर
1807. निद्रीस्ताचे शेजे सर्प का उर्वशी ।पाहो विषयासी तैसे आम्ही ॥ १ ॥
ऐसी कृपा केली माझ्या केशीराजे ।प्रतितीचे भोजे एकसरा ॥ २ ॥
मृण आणि सोने भासते समान ।रत्न का पाषाण एकरूप ॥ ३ ॥
पाया लागो स्वर्ग वरी पडो वाघ ।चित्त स्थिती भंग नोहे नोहे ॥ ४ ॥
नामा म्हणे कोणी निंदा आणि वंदा ।झालो ब्रम्हानंदाकार आम्ही ॥ ५ ॥
