वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 194. आत्मनिवेदन कृपादान

नामयाने बंद रे घेतिल

🙏 4. संत नामदेव · ABH-082678 · अभंग क्र. १८१६

1816.
नामयाने बंद रे घेतिले | विठ्ठलासी जीत धरिले ॥१॥
नामा आलारे म्हणती | भेणे कळिकाळ कांपती ॥२॥
भाव भक्ति करोनि कडी | विठ्ठल पायी जडली बेडी ॥३॥
देह करूनि बंदिठाणा | विठ्ठल सांठविले निधाना ॥४॥
सोह शब्दे मार केला | विठ्ठल काकुलती आला ॥५॥
नामा म्हणे विठ्ठलाते | जीवे गेल्या न सोडी तूते ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग