दासां दुःख झाले फार
1826.
दासां दुःख झाले फार । वेगी करा प्रतिकार ॥१॥
सुख मानिले संसारी । दासा दुःख झाले भारी ॥२॥
सोडुनियां मी स्वधर्म । आचरलों नीच कर्म ॥३॥
सेवा केली नीच याती । द्रव्यलोभें घाताघातीं ॥४॥
अन्न ग्रास न जाय मुखी । पश्चात्ताप झाला शेखी ॥५॥
पुण्यस्थान मी पावलोम । गुरुचरणी विश्रामलों ॥६॥
स्वामी विनंती अवधारा । दीनबांधी करुणाकरा ॥७॥
कर जोडोनिया शीर । ठेवियले पायांवर ॥८॥
जन्मनाम जनार्दन । मुखी गुरुअभिधान ॥९॥
