श्रीगुरुचे नाममात्र
1806.
श्रीगुरुचे नाममात्र । तेंचि आमुचे वेदशास्त्र ॥१॥
श्रीगुरुंचे तीर्थ मात्र । सकळ तीर्था करी पवित्र ॥२॥
श्रीगुरुंचे चरणरज । तेणे आमुचे जाहलें काज ॥३॥
श्रीगुरुंची ध्यानमुद्रा । तेंचि आमुचि योगनिद्रा ॥४॥
एका जनार्दनी मन । श्रीगुरुचरणीं केले लीन ॥५॥
