मीच माझा देव मीच माझ
1803.
मीच माझा देव मीच माझा भक्त | मी माझा कृतार्थ सहज असे ॥१॥
बंध आणि मोक्ष मायेची कल्पना | पडली होती मना भ्रांति कैसी ॥२॥
विठ्ठले विचारे दाखविले सुख | होते जे असंख्य हरपले ॥३॥
नामा म्हणे सोय सांपडली निकी | जालो येकायेकी हरिचा दास ॥४॥
