वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ४. सार्थ अभंग १५०१ ते २०००

नेणे अर्थ काही नव्हत

🙏 3. संत तुकाराम · ABH-080203 · अभंग क्र. १८०८

1808.
नेणे अर्थ काही नव्हती माझे बोल । विनवितो कोपाल संत झणी ॥१॥
नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगे व्यापूनिया ॥धृपद॥
मज मूढा शक्ती कैचा हा विचार । निगमादिका पार बोलावया ॥२॥
राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबड्या उत्तरी हेचि ध्यान ॥३॥
तुका म्हणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगे भार घेतला माझा ॥४॥

अर्थ :
हे संतजन हो मी जे काही बोलत आहे ते माझे शब्द नसून प्रत्यक्ष पांडुरंगाचे शब्द आहेत त्या शब्दाचाअर्थ : देखील मला कळत नाही आणि जरी बोलताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही माझ्यावर रागवू नका ही विनंती मी तुम्हाला करत आहे. हे माझे शब्द नसून माझ्या संपूर्ण अंगामध्ये व्यापून उरलेला जो पांडुरंग आहे त्याचे हे शब्द आहेत. मी तर मुर्ख आहे आणि वेदाचा विचार करण्या एवढी शक्ती माझ्या मध्ये कशी असणार. मी तर माझ्या मुखाने केवळ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी असे बोबडे शब्दाने बोलत असतो आणि त्याचे चिंतन मी नेहमी करत असतो. तुकाराम महाराज म्हणतात मला तर केवळ गुरुकृपेचा आधार आहे आणि पांडुरंगाने माझा योगक्षेमाचा भार घेतला आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग