योगाने जोडिली सायासे
1809.
योगाने जोडिली सायासे | ते मज वोळली बोरसे ॥१॥
बरवी कामधेनु गाय | विठाबाई माझी माय ॥२॥
नसता सडा साठवण | तृप्त केले त्रिभुवन ॥३॥
कोटि कुळे वोरसली | पुरोनि अवघींच उरली ॥४॥
न साहे अहंकाराचा वारा | आली दीनाचिया घरा ॥५॥
नामा म्हणे है दुभते | जोडुनि दिधले असे आइते ॥६॥
