सकळही तीर्थेनिवृत्ती
1.
सकळही तीर्थेनिवृत्तीच्या पायी । तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥
आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण । वृत्तींसी मार्जन केले असे ॥२॥
एकार्णव झाला तरंगु बुडाला । तैसा देह झाला एकरूप ॥३॥
बापरखुमादेविवरे विठ्ठले नवल पै केले । तारु हरविले मृगजळी ॥४॥
