जागा रे गोपाळांनो रा
1.
जागा रे गोपाळांनो रामनामी जागा ।
कळिकाळ आकळा महादोष जाती भंगा ॥१॥
सहस्त्रदळ समान अनुहत ध्वनि उठी ।
नामाचेनि बळे पापे रिघाली कपाटी ॥२॥
दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन ।
एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण ॥३॥
द्वादशी साधन कोटीकुळे उध्दरती ।
नामा म्हणे केशव ठाव देईल वैंकुठी ॥४॥
