क्षीरसागरींचे नावडे
1.
क्षीरसागरींचे नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥
कवळ कवळ पाहा हो । मुख पसरुनि धांवतो देवो ॥२॥
एकाद्शी देव जागरा आला । क्षीरापतीलागी टोकत ठेला ॥३॥
व्दादशी क्षीरापती ऐकोनी गोष्टी । आवडी देव देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालिता वैष्णवा मुखी । तेणे मुखे देव होतसे सुखी ॥५॥
क्षीरापती सेविता आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥
क्षीरापती सेविता वैष्णवा लाहो । मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दनमुखी । एका एकी तेणे होतसे सुखी ॥८॥
