वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 2. सोमवारचे अभंग

ॐ नमो शिवा आदि । काव

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073663 · अभंग क्र. १

1.
ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदी ।
मिळाली संत मांदी । त्याचे चरणरेणु वंदी रे ॥१॥
शिवनाम शीतळ मुखी । सेवी पा कापडिया रे ।
दड दड दड दड दुडु दुडु दुडु दुडु ।
पळ सुटला कळीकाळा बापुडिया रे ॥२॥
गुरुलिंग जंगम । तेणे दाविला आगम ।
आधी व्याधि झाली सम । तेणे पावलो विश्राम रे ॥३॥
जवळी असता जगज्जीवन । का धांडोळीसी वन ।
एकाग्र करी मन । तेणे होईल समाधान रे ॥४॥
देहभाव तेथे विरे । ते साधने दिधले पुरे ।
बापरखुमादेवी वरे । विठ्ठलुरे विठ्ठलुरे विठ्ठलुरे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग