उभारिला ध्वज तिही लो
1.
उभारिला ध्वज तिही लोकावरी । ऐसी चराचरी किर्ति ज्यांची ॥१॥
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञानदीप्तिकळा ॥२॥
धरुनी सगुणरुपे केली बाळक्रीडा । बोलविला रेडा निगमवाचे ॥३॥
बैसुनिया वरी चालविली भिंती । चांगदेवाप्रति दीली भेटी ॥४॥
मग वास केला अलंकापुरासी । पिंपळ द्वाराशी कनकाचा ॥५॥
नीळा म्हणे ज्यांच्या नामे करीता घोष । नातळती दोष कळिकाळाचे ॥६॥
