संत चांगदेव महाराज अ
1.
संत चांगदेव महाराज अभंग गाथा
स्वप्नींची आत्मा केउता आहे ।
मागुता ये हैं नवल काई ॥१॥
चांगा म्हणे आहे सांग मुक्ताबा
लटिकें साथ वर्ततें देही ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया मिस्त ।
देही निर्धारीं राही स्वप्न कैचें ॥३॥
2.
बंधन नाही बद्ध नाही ।
साच की लटिकें तेंही नाही ॥१॥
भेद नाही भेदसी काई ।
साच की लटिके वर्तते देही ॥२॥
चांगा म्हणे सांग मुक्ताबाई ।
साच की लटिकें वर्तते देही ॥३॥
3.
मी माझें दुरित आशापाश चित्तीं ।
मोह ममता भ्रांति अहंभावें ॥१॥
हरितसे तेज अभिमान ताठा ।
एकतत्त्वे वैकुंठा हरिपाठें ॥२॥
नाशिवंत देह पंचतत्त्वमोळी ।
पायांच वाहादुळी उडोनि जाये ॥३॥
मुक्ताई जीवन चांगया दिधले ।
निर्गुणी साधिलें घर कैसे ।
4.
नाही सुखदुःख पापपुण्य नाही ।
नाही कर्मधर्म कल्पना नाही ॥१॥
नाही मोक्ष ना भवबंधन नाही ॥२॥
म्हणे वटेश्वरा ब्रह्म नाही ।
सहजसिद्ध बोले मुक्ताई ॥३॥
5.
हेमी हेम प्रचित पाही ।
अनुभव आलिया सांगा तें काई ॥१॥
सोहंकर मन न सोडी साचे ।
मी नाही तेथे तू कैचे ॥२॥
अहंतेसी सोहं से गुज ।
मुक्ताई म्हणे चांगया बुझ ॥३॥
6.
ऐकें चांगया फळ फळासी आले ।
येऊनिया नासून गेले ॥१॥
सोडी सोडी भवाची भ्रांति ।
तेणें होय अज्ञान निवृत्ति ॥२॥
चांगा वटेश्वरी फळला ।
विज्ञानफळीं परिपाका आला ॥३॥
7.
गुण ना निर्गुण शब्दातीत तेथें
तू निश्चित निज बाळा ॥१॥
पाळणा लाविला हृदय कमलीं ।
मुक्ताई जवळी सादविते ॥२॥
शांति क्षमा दया विदेह वर्णिती
नांव में ठेविती अद्वैतासी ॥३॥
वटेश्वर सुत चांगा अवधूत
मुक्ताई शांती ज्ञानदृष्टी ॥४॥
8.
निर्गुणाचे डाळीं पाळणा लाविला ।
तेथें सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥
निज निज बाळा न करी पै आळी
अनुहात टाळी वाजविते ॥२॥
तेथे निद्रा ना जागृती भोगी में
उन्मनी लक्ष तो भेनि निजना तो॥३॥
निभ्रांत पाळी पाळणा विणवूनी मन
हैं बांधोनि पवन दोरी ॥४॥
एकाविस सहस्र सहाशे वेळे बाळा।
तेही डोळा स्थिर करी ॥५॥
निद्रा ना जागृति निजसी वा काई
परियेसी चांगया बोले मुक्ताबाई ॥६॥
9.
बाळक चुकलें सुकुमार तान्हुलें ।
त्याने पै सांडिलें मायाजाळ ॥१॥
जो जो जो जो पुत्रातें निजवी ।
अनुहात बोवी नि:शब्दाची ॥२॥
मावळली दिशा वाचा पे खुंटली
माया मै भेटली मुक्ताबाई ॥३॥
मुक्ताई म्हणे नांव पे ठेवीन
सुता बोलाविन वटेश्वरा ॥४॥
10.
अविनाश पाळणा अव्यक्तं विणीला
तेथें योगीराज पहुडला ॥१॥
जो जो जो जो म्हणतसे माया।
साकारातीत निजरे चांगया ॥२॥
सोह सोहं षट्चक्र न्यासे तु
परिये देता मीच न दिसे ॥३॥
ऐसी निद्रा तुज लागोरे पुत्रा
मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा ॥४॥
11.
ब्रह्मांड गोळकीं पवनाच्या पालखीं ।
अवधूत कवतुकीं पहुडलासे ॥१॥
बोलवी चांगया मुक्ताई माता ।
ब्रह्मविद्या पर्यदं सुख देखता ॥२॥
डोळा लाउनि निजी निजेला
निवांत स्वप्नीं वटेश्वर देखिला निवांत ॥३॥
12.
रूप ना छाया त्रिगुणरहित ।
ज्योतिस्वरूप हैं पा नित्य ॥१॥
जाणे येणे नाही निर्गुण पाही ।
चैतन्य होई शुद्धबुद्ध ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया वटेश्वरा ।
निरुता पाहे स्वयें साकारा ॥३॥
13.
चांगा जन्मला माध्यान्ह काळी ।
मायबापें दोन्ही नाहीसीं जालीं ॥१॥
मुळींच चांगा नाहींसा जाला ।
मुक्ताई म्हणे चांगया भलाभला ॥२॥
वटेश्वर चांगा मुळी लागला ।
पोसणा घेतला मुक्ताईनें ॥३॥
14.
सुखाचे शेवटी दुःख आले भेटी
भेटीलिया साठीं तेही नुरे ॥१॥
सुख तें कवण दुःख तें कवण
दोही अज्ञान करी पारे ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया चैयी
स्वयंभू चेड़ला वटेश्वरापायीं ॥३॥
15.
जेथें एक दुजे नाही प्रपंचाची ।
काहाणी तेथें कांहीं ॥१॥
तेथे काहींच नाही तेथें कांहींच ।
नाही सोय धरि आपुली रे ॥२॥
वटेश्वरमुतातें बोले मुक्ताई ।
सोहंभायें अखंडित राही ॥३॥
16.
रावळीचे कर चुकले जाण ।
गिवसिताती साहीजण वेळोवेळा ॥१॥
करी कर धरियला मुष्टी ।
करे ‘आपुल्या समावले दृष्टी ॥२॥
मुक्ताई करे लेईले अंजन ।
चांगया निधान उपदेशिलें ॥३॥
17.
कावरी कल्पावरी एक कुली ।
तेथे एक पाळी दिस्मो करी ॥१॥
तियें नांव काय त्याचे नांव ।
काय विचारोनि पाहे मनामाजी ॥२॥
डोळियांतील बाहुली जालीसे गरुवारू ।
तिशी सुई मेळवा अरुवारू ॥३॥
सुईचें आणीवर रचिलें पाठार मुक्ताई ।
म्हणे चांगया सांग याचा विचार ॥४॥
18.
आकाशाचा शेंडा घार ।
रांधी मांडा काउळा वादी ।
कांदा कुल्लाळ भोजन करी ॥१॥
दिहा पडे चांदणें रात्री ।
पडे उष्ण चोर घरटी पाली ।
तराळ घाली खाण ॥२॥
सासुनें खादले उंडे ।
सुन तरळे लेकी लासिली ।
जांवाई गडबडा लोळे ॥३॥
धमकत घुसळण घातले पारी ।
वटेश्वरमुता म्हणे मुक्ताई अवधारी ॥४॥
