वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 16. तीर्थ महात्म्य अभंग › ४. पंढरपूर महात्म्य संक्षिप्त माहितीसह

पंढरपूरचा महिमा सार

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073559 · अभंग क्र. १

पंढरपूरचा महिमा सार
चंद्रभागा.....
वारकरी संप्रदायात चंद्रभागेला खूप महत्व आहे. आधी स्नान चंद्रभागेचे मग भगवंत कथा त्यानंतर विठ्ठलाचे दर्शन.. एक वेळेस विठ्ठलाचे दर्शन नाही झाले तरी । चालेल पण चंद्रभागेचे स्नान झाले पाहिजे. एवढे श्रेष्ठत्व चंद्रभागा नदीचे आहे. देवांनी तुकाराम महाराजांना विचारले, काय पाहिजे तुम्हाला? जे पाहिजे ते मागा... त्यावर तुकोबा म्हणाले, देवा मला काहीही नको. चंद्रभागेचे स्नान घडू दे... एवढे वारकरी संप्रदाय आणि चंद्रभागेचे जवळचे नाते आहे. भगवान शंकर ऋषींना सांगतात कि या भूतलावावरील सर्व तीर्थे रात्री बारा वाजता भक्त पुंडलिकासमोर स्नान करून पवित्र होऊन जातात. सर्व तीर्थांना पवित्र करणारे तीर्थ कोणते असेल तर ती चंद्रभागा. नुसती चंद्रभागा नदी पहिली तरी भूतलावरील सर्व तीर्थांचे स्नान केल्याचे पुण्य मिळते. सर्व दोष घालवण्याची शक्ती चंद्रभागा दर्शनात आहे. यामुळे सर्वोत्कृष्ट क्षेत्र आणि तीर्थ म्हणजे चंद्रभागा आहे.

भक्त पुंडलिक....
वारकरी संप्रदायात भक्त पुंडलिकाला आद्य स्थान आहे. भक्त पुंडलिकाचे दर्शन केल्याशिवाय विठोबाचे दर्शन रुजू होत नाही अशी वारकरी संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने भक्त पुंडलिकाचे दर्शन घेतात. पुंडलिक मंदिरासमोर लोहृदंड तीर्थ आहे कि त्यामध्ये दगडी नाव पाण्यावर तरंगते. त्याविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते कि गौतम ऋषींनी इंद्राला शाप दिला तेव्हा इंद्राला भग पडली. त्यातून मुक्त होण्याचा मार्गहि ऋषींनी सांगितला भूतलावार ज्या तीर्थामध्ये लोहरूपी पाषाण तरंगेल त्या तीर्था मध्ये स्नान केल्यानंतर मुक्ती मिळेल. तेव्हा फिरत फिरत इंद्रदेव दंडक अरण्यात आले असता पाषाण लोह्दंड तीर्थामध्ये तरंगला. इंद्राने त्यामध्ये स्नान केले. देव भगातून मुक्त झाला. तो पाषाण म्हणजे दगडी नाव. ती पाहण्यासाठी भाविकांबरोबर देश विदेशातून अभ्यासकही येतात.

गोपाळपूर येथील कृष्ण मंदिर....
पंढरपूर पासून दोन किलो मीटर आंतरवर असण्याऱ्या गोपाळपूर येथील कृष्ण मंदिराला खूप महत्व आहे कारण श्रीकृष्ण येथे सवंगड्या सोबत खेळला त्याने गोपाळ काला केला यामुळेच पौर्णिमे दिवशी संतांच्या पालख्या इथे येतात गोपाल काला करतात आणि आषाढी यात्रेच्या नेत्रदीपक सोहंळ्याची सांगता होते याच ठिकाणी पांडुरंग संत जनाबाईला जात्यावर दळण दळू लागला इथेच जनाबाईची संसार पाहायला मिळतो या कारणांमुळे भाविक न चुकता कृष्ण मंदिराला भेट देतात जनाबाईची संसार पाहतात आणि आनंदानी गावी परत जातात.

लखुबाई....
माता रुक्मिणी श्रीकृष्णावर रुसून पंढरपूरला आली आणि दिंडीर वनात लपून बसली. लपून बसली ती लखुबाई असे सांगितले जाते. लखुबाई दर्शनला भाविक आवर्जून येतात, विशेषतः महिला. त्यामागे अशी धारणा आहे कि दिंडीर वनातील लखुबाईचे अर्थात लपून बसलेल्या माता रुक्मिणीचे दर्शन घेतल्याने पतीला दीर्घायुष लाभते, संसार सुखाचा होतो. त्यामुळे महिला भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग