वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › २२. संसार भारुड

संसार भारुड

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073483 · अभंग क्र. १

1.
संसार भारुड
सांगते तुम्हा वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥
संसार करिता शिणले भारी । सासु सासरा घातला भरी ॥२॥
संसार करिता शिणले बहू । दादला विकून आणले गहू ॥३॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणता कैशी ॥४॥
संसार करिता दगदगले मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥
एकाजनार्दनी संसार केला । काम क्रोध देशोधडी गेला ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग