देव गुज सांगे पंढरीस
1.
देव गुज सांगे पंढरीसी यारे । प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे ॥१॥
काया वाचा मन दृढ धरा जीवी । सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
भवसिंधु तारील घ्या रे माझी भाक । साक्ष पुंडलिक करुनि बोले ॥३॥
लटिके जरी असे नामयासी पुसा । आहे त्या भरंवसा नामी माझ्या ॥४॥
