संत सोपानदेवांचे अभं
1.
संत सोपानदेवांचे अभंग
उघडली दृष्टी इंदियासकट ।
वैकुंठीची वाट पंढरी जाणा ।।१।।
दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत ।
पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे ।।२।।
हाची मार्ग सोपा जनासी उघड ।
विषयाचे चाड टाकी परतें ।।३।।
सोपान म्हणे गुंफसी सर्वथा ।
मग नव्हे उलथा भक्तीपंथे ।।४।।
2.
चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीयेसी ।
प्रेमामृत खुण मागो त्या विठ्ठलासी ।।१।।
चालिले गोपाळ दाविताती वाकुंलिया ।
भरले प्रेमरसे मग ते वाताती टाळीया ।।२।।
दिंड्या गरुडटके मृदुंगाचे नाद ।
गाताती विठ्ठलनाम करिताती आल्हाद ।।३।।
पावले पंढरी भीमा देखियेली दृष्टी ।
वैष्णवाचा गजरु आनंदे हेलावली सृष्टी ।।४।।
गजरु गोपाळांचा श्रवणी पडियेला ।
शंखचक्र करी विठ्ठल सामोरा आला ।।५।।
कांसवदृष्टी न्याहाळीतु रंगी नाचतु पै उगला ।
सोपान म्हणे आम्ही केला वाळूवंटी काला ।।६।।
3.
आणीक ऐकेगा दूता । जेथे रामनाम कथा ।
तेथे करद्वय जोडूनी हनुमंता । सदा सन्मुख असिजे ।।१।।
रामनामी चाले घोषु । तो धन्य देशु धन्य दिवसु ।
प्रेम कळा महा उल्हासु । जगन्निवासु विनवितुसे ।।२।।
दिंड्या पताका मृदंग । टाळ घोष नामे सुरंग ।
तेथे आपण पांडुरंग । भक्तसंगे नाचत ।।३।।
तया भक्ता तिष्ठती मुक्ती । पुरुषार्थ तरी नामे कीर्ति ।
रामनामी तया तृप्ती । ऐसे त्रिजगती यमु सांगतु ।।४।।
ज्या नामे शंकर निवाला । गणिका अजामेळ पद पावला ।
अहिल्येचा शाप दग्ध जाला ।तोची पान्हा दिधला पांडुरंगे ।।५।।
चित्रगुप्त म्हणती यमा । काय करावे गा धर्मा ।
लोक रातले रामनामा । पुरुषोत्तमा विठ्ठल देवा ।।६।।
कळिकाळासी दाटुगें नाम । रुद्रे धरिले महा प्रेम ।
त्रिभुवनी विस्तारले सप्रेम । रामनाम उच्चारी यम ।
तोही तरला जाणा ।।७।।
ऐसे नाम अगाध बीज । उच्चारी तो होय चतुर्भुज ।
सोपान म्हणे हे गुज । उमाशंकर देवाचे ।।८।।
4.
सर्वकाळ ध्यान हरिरूप ज्याचे ।
तया सर्व रूप साचे जवळी असे ।।१।।
हरि हरि जाला प्रपंच अबोला ।
हरिसुख निवाला तोचि धन्य ।।२।।
हरि हेचि मन संपन्न अखंड ।
नित्यता ब्रह्मांड त्याचे देही ।।३।।
सोपान विदेही सर्वरूपी बिंबतू ।
हरिरूपी रतु जीव शिव ।।४।।
5.
मनाचे मवाळ हरिरूप चिंतिती ।
रामकृष्ण मूर्ति नित्य कथा ।।१।।
रामकृष्ण ध्यान सदा पै सर्वदा ।
न पवेल आपदा नाना योनी ।।२।।
हरि ध्यान जप मुक्त पै अनंत ।
जीव शिवी रत सर्वकाळ ।।३।।
सोपान प्रेमा आनंद हरीचा ।
तुटला मोहाचा मोहपाश ।।४।।
6.
आवडीचें मागे प्रवृत्तीचे नेघे ।
नाममार्गे वळगे निघे राया ।।१।।
नाम परब्रह्म नाम परब्रह्म ।
नित्य रामनाम जपिजेसु ।।२।।
अंतरींचिया सुखे बाहिरिलिया वेखें ।
परब्रह्म मुखे जपतुसें ।।३।।
सोपान निवांत रामनाम मुखांत ।
नेणे दुजी मात हरिविण ।।४।।
7.
सबाह्य कोंदले निवांत उगले ।
रामरसें रंगले अरे जना ।।१।।
हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण ।
दिननिशी प्रश्न मुखें करा ।।२।।
तरा पै संसार रामनामे निरंतर ।
अखंड जिव्हार रामरसा ।।३।।
सोपान जपतु रामनामी रतु ।
नित्यता स्मरतु रामकृष्ण ।।४।।
8.
अव्यक्ताच्या घरी प्रकृति कामारी ।
निघे माजि घरी दडोनिया ।।१।।
तैसे नका करू प्रगट सर्वेश्वरू ।
हरीनाम उच्चारू जपा वाचे ।।२।।
विज्ञानी पै ज्ञान आटलेसे संपूर्ण ।
उभयता चैतन्य तैसा हरि ।।३।।
सोपान निवांत रामनामी रत ।
संसार उचित रामनामे ।।४।।
9.
मोक्षलागी धन वेंचावे नलगे ।
रामकृष्ण बोलगे जपीजेसु ।।१।।
रामकृष्ण मुखें तया अनंत सुखे ।
तो जाय विशेषे वैकुंठभुवनी ।।२।।
वेगाचेंनी वेगे जपा लागवेगें ।
प्रपंच वाऊगे हरिनामे ।।३।।
सोपान संचित रामनामामृत ।
नित्यता सेवित हरिकथा ।।४।।
10.
ज्याचे मुखी हरि तोचि धन्य ये जगी ।
तरला पै वेगी वेदु बोले ।।१।।
हरि हाचि आत्मा तत्व पै हे सोपे ।
हरितील पापे हरिनामे ।।२।।
वैकुंठीचे सुख नलगे पै चित्ती ।
हरि हेचि मूर्ति विठ्ठल ध्यावो ।।३।।
याचेनि स्मरणे कैवल्य साचार ।
सोपान विचार हरि जपे ।।४।।
11.
हरिनाम जपे सहस्त्रवरि सोपे ।
जातीलरे पापे अनंतकोटी ।। १।।
हरिविण नाम नाहीपारे सार ।
दुसरा विधार करू नको ॥२॥
हरि ध्यान चोख पवित्र परिकर ।
नित्यता शकर हरिष्यानी।।३॥
शा सोपान म्हणे हरि जप करारे सर्वथा ।
न पावाल व्यथा भवजनी ॥४॥
12.
कृष्णाचिया पंथे चालिलो दातारा ।
तब मार्ग येसरा तुजमाजी ।।१।।
आदि ब्रह्ममूर्ति तूचि विष्णु स्थिती ।
तुज कैवल्यपती मोल नाही ।।२॥
अमोल्य जे वस्तु पुंडलिक देवा ।
जगाचा विसावा जनकु माझा ॥३॥
सोपान म्हणे साफडे तुजचि सर्व कोडे ।
विनवितु मी बाडे वरणापाशी ॥४॥
13.
राम कृष्ण मूर्ति या पुजीतसे भावे ।
सर्व तुवा व्हावे केशीराजा ॥१॥
रामकृष्ण म्हणे नित्य काळसदा ।
नेणे दुजा बंदा तुजविण ॥२॥
माहेर आठवे करिता कामना ।
तुझ्या चरणी वासना जडोनि ठेली ॥३॥
सोपान म्हणे सरते तुजचि आवडते ।
माझया मनोरथे तूची आशा ॥४॥
14.
भी नेणे ती भक्ति नेणे त्या मुक्ति ।
तुझ्या नामपंथी मार्गु मना ॥१॥
हेचि मज चाड न करि मी आशा ।
तुज हषीकेशा चितितुसे ।।२।
तूची माझे धन जोडी हे निजाची ।
जननी तू आमुची जीवलगे ।।३।।
सोपान म्हणे तुजविण न कळे ।
तुजमानी सोडळे मने केले ॥४॥
15.
सर्वपटी रुप समसारिखे आहे ।
म्हणोनिया ते सोय आम्हा भक्ता ।।१।।
निर्गुणी सगुण गुणामाजी गुण ।
जन तू संपूर्ण दिससी आम्हा ॥२॥
तेचि रुप रूपस दाविसी प्रकाश ।
पंढरीनिवास होऊनी ठासी ॥३॥
सोपान सलगी न बोलता उगा ।
तुजविण वाउगा ठाव नाही ॥४॥
16.
सागरीचे सोय जगा निवारीत ।
मागुते भरीत पूर्णपणे ।। १॥
तैसे आम्ही दास तुज माजी उदास ।
तू आमुचा निवास सर्व देवा ॥२॥
तुजमाजी विरो सुखदुः विसरो ।
तुझ्यानामे तरो येची जन्मी ।।३।।
सोपान निकट बोलोनी सरल ।
तुष्टला गोपाळ अभय देत ॥४॥
17.
हरिसुखवेषे नाचतो सर्वदा ।
गोविंद परमानंदा हरिबोधे ॥१॥
रामकृष्ण नामी या नामी आनंदु ।
नित्पनित्य गोविंद आम्हाधरी ॥२॥
निगुण नेणे सगुणाचार ।
सगुण विचार सर्वकाळ ॥३॥
सोपान पावप अवघेचि हरिरुप ।
हरिविण स्वरुप ने चित्ती॥४॥
18.
गोपाळ अच्युत हा नाममहिमा ।
नित्यता पूर्णिमा आम्हा देही ॥१॥
रामकृष्ण नाम हा जप परम ।
ऐसा नित्य नेम सारू रया ॥२॥
वासना वोढाळ नेषो पै बरळ ।
नित्यता अढळ गोपाळ सेवू ॥३।।
सोपान सार जपतुसे नाम ।
दिननिशी नेम हृदयात ॥४॥
19.
गोविंद मायव हा जपु आमुचा ।
नाही प्रपंचाचा आम्हा लेशु ॥१॥
गोविंद स्मरणे नित्यता पारणे ।
हरिनाम पटणे मोभमुक्ति ।। २।॥
नलगती तीर्थे एक गोविंद पुरे ।
वेगी कृष्ण धुरे बोलगो सदा ॥३॥
सोपान सांगत गोविंद स्मरणे ।
नित्यता ध्याने गोविंद ऐसे॥४॥
20.
विठ्ठल पै सार हा जपु आमुचा ।
आणि त्या शिवाचा नित्यनेमु ।।१।।
गोविंद श्रीहरि हेचि तो उच्चारी ।
शिव वराचरी आत्माराम ।।२।।
नामेविण नेणे दुनियाची मातु ।
गोविंद स्मरतु शिवराणा ॥३॥
सोपान धारणा गोविंद पाठाची ।
कोटि पै कुळाची कुळवडी ।।४।।
21.
हरिविण दुजे न देखे चित्त माझे ।
म्हणोनि सहजे विचरतु १॥
सर्व हरि हरि तो माझा कैवारी ।
दुजी भरोबरी नेघो आम्ही ॥२॥
राम हा सकळ सर्व आम्हा आहे ।
दुजे ते न साहे परब्रह्मी ॥३॥
सोपान सलगी विनवितो तुम्ता ।
सर्व हा परमात्मा आम्ता दिसे ।।४।।
22.
हरिविण दुजे नावडे पै दैवत ।
जी समर्थ बोले सृष्टि ।।१।।
हरिराम गोविंद नित्य हाचि छंद ।
हृदया आनंद प्रेमबोधु ॥२॥
हरि हेचि दैवत समर्थ पै आमूचे ।
बोलणे वेदांचे बोलती मुनी ॥३॥
सोपान आलगटु नामपाठ वावे ।
नित्य विठ्ठलाचे चरण सवयी ॥४॥
23.
नाही नाही भान न दिसे प्रपंच ।
रोहिणी आहाव मृगजळ ।। १।।
तुटलासे साटा वासना चोखाळ ।
दिननिशी फळ राम झाला ॥२॥
रामेविण दुजे नाही पै हो बिजे ।
बोलतु सहजे वेदु जाणा ॥३॥
निरवृत्ति खुणा विज्ञान देवा हरि ।
सोपान झडकरी झोबियेला ॥४॥
24.
तुझा तुचि थोर तुज नाही पार ।
आमुचा आचार विद्वलदेव ।। १।।
आपी सधर सर्व हा श्रीधर ।
सर्व कुळाचार पांडुरंग ॥२॥
न दिसे दुसरे निर्धारिता खरे ।
श्रीगुरूविचारे कळले आम्हा ॥३॥
सोपान म्हणे रखुमादेवीवर ।
तूचि आमुचे पर कुछवटी ॥ ४ ॥
25.
मी माझी कल्पना पळाली वासना ।
जनी जनार्दना सेवितुसे ॥१॥
तू तव संपन्न आमुवे हो थन ।
सांगितली खूण निवृत्तीदेवी ॥२॥
तुजमाजी प्रेम गेले सप्रेमे ।
जप व्रत नेम हारपले ॥३॥
सोपान सगळा न दिसे इही डोळा ।
तूची बा गोपाळा आत्माराम ॥४॥
26.
आत्मरुप सुख आत्मपणे चोख ।
निर्गुणीचे चोख सगुणी जाले ।।१।।
रुप अरुप रूयामाजी सर्व ।
रूपी भावाभाव नाटवती ।॥२।।
बुडाले सगुण नाही मी तू पण ।
अंतराची खूण मावळली ॥३॥
सोपान गुरू ते ते ब्रह्म पुरते ।
पुसोनी आरूते ठाकियेले ॥४॥
27.
पहाते न नटे मन तिये वाटे ।
बोलणेची खुटे बोलणेपणे ॥१॥
परतल्या श्रुती पडियेले मौन ।
शास्त्र ते संपन्न नेणे तया ॥२॥
गेला तो आचार आवघाची विचार ।
परे परता पर परब्रह्म ॥३।।
शा सोपान दयाळ गुरूनामे बळ ।
आपण निखळ आपरूपे ॥४॥
28.
दिन व्योम तारा ग्रहगण शेखी ।
एक हपीकेशी सर्व आम्हा ।।१।।
ब्रह्मेविण नाही रिता ठावो पाही ।
निवृत्तीच्या ठायी बुडी देत ।॥२॥
सर्व हे निखळ आत्माराम सर्व ।
नाही देहभाव विकल्यता ।।३।।
सोपान निकट गुरूनामपेठे ।
नित्यता वैकुंठ जवळी असे ॥४॥
29.
आम्ही नेणो माया नेणो ते काया ।
ब्रह्म लवलाह्या आम्हामाजी ।।१।।
मी तू गेले ब्रह्मी मन गेले पूर्णी ।
वासना ते जनी ब्रह्म जाली ॥२॥
जीवशिवभाव आपणची देव ।
केला अनुभव गुरूमुखे ।।३॥
सोपान ब्रह्म वर्ततसे सम ।
प्रपंचाचा अम नाही नाही ॥४॥
30.
दुजेपणी ठाव द्वैत हे फेडिले ।
अद्वैत बिंबले तेजोमय ।। १ ॥
तेजाकार दिशा बिंबी बिंब एक ।
निवृत्तीने चोख दाखविले ॥२॥
निमाली वासना बुडाली भावना ।
गेली ते कल्पना ठाव नाही ॥३॥
सोपान नैश्वर परब्रह्म साचार ।
सेवितु अपार नाम घोटे ॥४॥
