वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › १२. वाघ्या भारुड

वाघ्या भारुड

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073488 · अभंग क्र. १

1.
वाघ्या भारुड
अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी ।
सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी ॥१॥
मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी ।
बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥
आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी ।
एकाजनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचा वारी ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग