पावलो पंढरी वैकुंठभु
1.
पावलो पंढरी वैकुंठभुवन । धन्यआजि दिन सोनियाचा ॥धृ॥
पावलो पंढरी आनंदगजरे । वाजतील तुरे शंखभेरी ॥२॥
पावलो पंढरी क्षेम आळिंगनी । संत या सज्जनी निवविलो ॥३॥
पावलो पंढरी पार नाही सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥४॥
पावलो पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥५॥
पावलो पंढरी आपुले माहेर । नाही संवसार तुका म्हणे ॥६॥
