वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › १४. एडका भारुड

एडका भारुड

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073516 · अभंग क्र. १

1.
एडका भारुड
एडका मदन तो केवळ पंचानन ॥धृ॥
धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।
इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे ।
तो केवळ पंचानन ॥१॥
धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।
दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण ।
तो केवळ पंचानन ॥२॥
भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी ।
विश्वामित्रासरिखा ऋषी । नाडिला जेणे ।
तो केवळ पंचानन ॥३॥
शुकदेवांनी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी ।
एका जनार्दनी चरणी । बांधिला जेणे ।
तो केवळ पंचानन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग