संत सदन महिमा अभंग
1.
संत सदन महिमा अभंग
ज्या सुखाकारणे देव वेडावला । वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला ॥१॥
धन्य धन्य ते संतांचे सदन । जेथे लक्ष्मीसहित शोभा नारायण ॥२॥
सर्व सुखाची सुख राशी । संत चरणी भुक्ति मुक्ति दासी ॥३॥
एका जनार्दनी पार नाही सुखा । म्हणोनि देव भुलला देखा ॥४॥
