वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 4. वामन जन्माचे अभंग

वामन जन्माचे अभंग प्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073294 · अभंग क्र. १

1.
वामन जन्माचे अभंग प्रारंभ

बळीराजा दैत्य बहूत मातला । संपत्ती हरिल्या देवांचिया ॥१॥
तया काळी जे जे देव आठविती । प्रार्थना करिती देवदेवा ॥२॥
तया काळी तुवा आदिति उदरी । अवतारधारी बटू झाला ॥३॥
छळूनिया बळी पाताळी घातला । आपण राहिला तया द्वारी ॥४॥
देव देवपदी बैसऊनि सारे । राखीतसे द्वार नामा म्हणे ॥५॥

वामन जन्माचे अभंग समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग