प्रेतयात्रा/ स्मशान
1.
प्रेतयात्रा/ स्मशान यात्रेचे/निर्याणपर अभंग
धन मान बळे नाठविसी देवा । मृत्यू काळी तेंव्हा कोण आहे ॥१॥
यमाचे यमदंड बैसतील माथा । तेंव्हा तुज रक्षिता कोण आहे ॥२ ।
माय बाप बंधू तोवरी सोयरी । इंद्रिये जो वरी वाहताती ॥३॥
सर्वस्व स्वामिनी म्हणविसी कांता । तीही केस देता रडतसे ॥४॥
विष्णुदास नामा जाताची शरण । स्वप्नी जन्म मरण नाही नाही ॥५॥
