वारीक भारुड
1.
वारीक भारुड
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक ॥१॥
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ ॥
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू ॥२॥
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू ॥
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥३॥
अर्थ :
श्रीविठ्ठल आणि वारकरी सांप्रदायाने फक्त जातीपातींच्या सीमा मोडल्या नाहीत तर प्रांताप्रांताच्याही सीमा ओलांडल्या. संत सेना महाराज त्याचेच एक उदाहरण. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले.
तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
अतीशय उच्च विचार सरनी व पंढरीनाथावर निष्टा असनारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात अशी त्याची जिवन यात्रा अखेर पर्यंत चालु राहीली बर्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले जिथ जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनरवैभव प्राप्त झाले राजा बिरसीहंनी त्याच स्वागत केल गावी आल्यानतंरही ते फारसे कुनात रमत नसत दृष्टी सतत शुन्यात होती येताना त्या पंढरीनाथाच रूप ङोळ्यात साठवल होत ऐकादशीला दिवसभर घरातच चितंनात मग्न राहीले दुसरा दिवस उजाडला कुनाशीही न बोलता धोकटी खुटीला अङकवून तिथच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लिन झाला. पंढरी ही त्यांच्या जीवनाचा ध्यास बनली.
तो दिवस श्रावन वद्य द्वादशी
