वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 5. श्रीकृष्ण जन्माचे अभंग

कृष्ण जन्माचे अभंग प

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073292 · अभंग क्र. १

1.
कृष्ण जन्माचे अभंग प्रारंभ

पापी जे अभक्त दैत्य ते माजले । धरणीसी झाले ओझे त्यांचे ॥१॥
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वा । न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहियेले यज्ञ मोडिले कीर्तन । पळाले ब्राम्हण दैत्या भेणे ॥३॥
वत्सरुपी पृथ्वी ब्रम्हयापाशी जाय । नेत्री वाहे तोय सांगतसे ॥४॥
बुडविला धर्म अधर्म झाला फार । सोसवेना भार मज आता ॥५॥
ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव । चालियेले सर्व क्षीराब्धीशी ॥६॥
नामा म्हणे आता करितील स्तुती । सावधान चित्ती परिसावे ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग