संत मुक्ताबाई अभंग ग
संत मुक्ताबाई अभंग गाथा
1.पंढरीमाहात्म्यपर
१.
मुक्तजीव सदा होति पै नामपाठे ।
तेंचि रूप ईटे देखिले आम्ही ॥१॥
पुंडलिकें विठ्ठल आणिला पंढरी ।
आणूनि लवकरी तारी जन ॥२॥
ऐसे पुण्य केलें एका पुंडलिकेंची ।
निरसिली जनाची भ्रमभुली ॥३॥
मुक्ताई चिंतनें मुक्त में जाली ।
चरणी समरसली हरिपाठ ॥४॥
२.
शून्यापरतें पाही तंव शून्य तेंही नाही ।
पाहाते पाहोनि ठायी ठेवियले ॥१॥
कैसागे माये हा तारकु दिवटा।
पंढरी वैकुंठा प्रगटला ॥२॥
न कळे याची गती आदि मध्य अंतीं ।
जेथें श्रुति नेति नेति प्रगटल्या ॥३॥
मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम ।
शून्याहि शून्य समशेजवाजे ॥४॥
३.
प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण ।
दीपें दीप पूर्ण एका तत्त्वे ॥१॥
देखिलेंगे माये पंढरिपाटणीं ।
पुंडलिका आंगणी विठ्ठलराज ॥२॥
विज्ञानेंसी तेज सज्ञानेंसी निज ।
निर्गुणेंसी चोज केलें सर्वे ॥३॥
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल ।
निवृत्तीने चोखाळ दाखविले ॥४॥
४.
अलिप्त संसारी हरिनामपाठे ।
जाईजे वैकुंठे मुक्तलग ॥१॥
हरिविण मुक्त न करि हो सर्वदा ।
संसारआपदा भाव तोडी ॥२॥
आशेच्या निराशीं अचेतना मारी ।
चेतविला हरि आप आपरूपें ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्तची सर्वदा ।
अभिनव भेदा भेदिले ॥४॥
५.
आधी तू मुक्तचि होतासिरे प्राणीया ।
परि वासनें पापिणीया नाडिलासी ।
आधीचे आठवी मग घेई परी ।
हरिनाम जिव्हारी मंत्रसार ॥१॥
आदि मध्य हरि ऊर्ध्व मे वैकुंठ ।
जाईल वासना हरि होईल प्रगट ॥धृ॥
एकतत्त्व धरी हरिनाम गोड ।
येर तँ काबाड विषय ओढी॥
नाम में सांडी वासना पापिणी ।
एक नारायणी चाड धरी ॥२॥
मुक्ताई मुक्तलग सांडिली वासना।
मुक्तामुक्ती राणा हरिपाउँ ।
नामाचेनि पोर्ट जळती पापराशी ।
न येती गर्भवासीं अरे जाना॥३॥
६.
नाम मंत्र हरि निज दासां पावे।
ऐकोनी घ्यावें झडकरी ॥१॥
सुदर्शन करी पावे लवकरी पांडवां ।
साहाकारी श्रीकृष्ण रथा ॥२॥
निजानंद दावी उघडें में बैकुंठ ।
नामेचि प्रगट आम्हालागीं ॥३॥
मुक्ताई जीवन्मुक्त हा संसार ।
हरि पारावार केला आम्ही ॥४॥
७.
भजनभावो देही नित्यनाम पेठा ।
नामेचि बैकुंठा गणिका गेली ॥१॥
नाममंत्र आम्हा हरिरामकृष्ण ।
दिननिशी प्रश्न मुक्तिमार्ग ॥२॥
नामचि तारक तरले भवसिंधु ।
हरिनामछंद मंत्रसार ॥३॥
मुक्ताई चिंतन हरिप्रेम पोटीं ।
नित्य नाम घोटी अमृत सदां ॥४॥
८.
मुक्त पै अखंड त्यासि में फावलें ।
मुक्तचि घडले हरिच्या पाठ॥१॥
रामकृष्ण मुक्त जाले पै अनंत ।
तारले पतित युगायुगीं ॥२॥
कृष्णनामें जीव झाले सदा शिव ।
बैकुंठ राणिव मुक्त सदा ॥३॥
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ति कोडे ।
जालें पै निवार्डे हरिरूप ॥४॥
९.
मुक्तामुक्त दोन्ही आईक तो ।
कर्णी हरिनाम वर्णी सदा काळ ॥१॥
नाही काळ तेथें आम्हा वेळ कैची।
हरिनामछंदाची गोडी थोरी ॥२॥
नाना विघ्नबाधा नाईकों आम्ही ।
कदा निरंतर धंदा रामकृष्ण ॥३॥
मुक्तपणे मुक्त मुक्ताई ।
हरिनाम सेवीत सर्वकाळ ॥४॥
१०.
आदि मध्य ऊर्ध्व मुक्त भक्त हरि।
सबाह्य अभ्यंतरी हरि एकु ॥१॥
नलगती तीर्थे हरिरूपें मुक्त ।
अवथि सूक्त जपिनिलें ॥२॥
ज्याचेनि नायें मुक्त में जडमूह ।
तरले दगड समुद्री देखा ॥३॥
मुक्ता हरिनामें सर्वदा पे मुक्त ।
नाही आदि अंत उरला आम्हा ॥२४॥
