* हरिपाठाचे नियम *
* हरिपाठाचे नियम *
1) आपण स्वतःकिंवा सर्वांनी एकत्र जमून सर्वांना हरिपाठाचे जाहीर आमंत्रण द्यावे.
2) विणेकरी हा माळकरी असावा (वारकरी पोशाखाच) असावा.
3) स्त्री,पुरुष, लहान मुले, मुली, यांना वेगवेगळ्या रांगेत उभे करावे. (वृध्द व्यक्तींना खाली किंवा खुर्चीत बसू द्यावे.)
4) शक्यतो सर्वांच्या अंगात पांढरा वारकरी पोशाख असावा.
5) चाली वारकरीच म्हणाव्या. (फिल्मी संगीताच्या) चाली विणेकऱ्याने स्वतः म्हणू नाही, व ईतर भजन्यांना म्हणू देऊ नाही.
6) हरिपाठ हा वैयक्तिक, आणि सामुहिक, म्हणता येतो.
7) हरिपाठ हा खाली बसून, उभ्याने, चालताना, पाउल्या खेळत, घरात, अंगणात, रस्त्यात, मंदिरात, दिंडीत चालतांना, ईतर काम करतांना सुद्धा म्हणता येतो.
8) हरिपाठात पाउल्या खेळतांना स्त्री, पुरुष यांनी सोबत न खेळता पुरुषांनी पुरुषाबरोबर आणि स्त्रियांनी स्त्रिया बरोबर खेळाव्यात.
9) हरिपाठात ईतर भजने, भावगीते, कविता, म्हणू नाही.
10) स्त्रिया आपला नित्यनेमाचा हरिपाठ मासिक पाळीच्या काळात सुद्धा (ग्रंथाला हात न लावता) स्वतः किंवा मागे मागे म्हणू शकतात.
11) हरिपाठात कुणाच्याही तोंडात पान, मावा, गुटखा, खर्रा, तंबाखू, बिडी, सिगारेट, नसावे, (तशी जाहीर सुचना हरिपाठ सुरु होण्यापूर्वीच विणेकऱ्याने द्यावी.)
12) हरिपाठ ज्या देवतेच्या मंदिरात/समोर असेल तर त्या देवतेची शेवटी आरती म्हणावयास हरकत नाही. आणि स्थानिक देवतेचा गजर सुद्धा करता येतो.
13) प्रत्येक अभंगाचे शेवटी धृपद (दुसरे चरण) म्हणावे, तशी प्रथा आहे.
