वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › ९. नामधारकाचा अधिकार अभंग

नामधारकाचा अधिकार श्

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073423 · अभंग क्र. १

1.
नामधारकाचा अधिकार श्रेष्ठता अभंग
गावंढे सहस्त्रब्राह्मण । तृप्त केलिया भोजन ।
पुण्य क्षेत्रीचा एकचि जाण । सुकृत तितुकेचि जोडे ॥१॥
ऐसे पुण्यक्षेत्रीचे दशशतक । तृप्त केलिया पाठक ।
पाहाता सुकृत । तितुकेचि जोडे ॥२॥
ऐसे सहस्त्रवेदपाठक । तृप्त केलिया पंडित एक ।
पहांता सुकृत । तितुकेचि जोडे ॥३॥
तैसेचि पंडित सहस्त्र एक । तृप्त केलिया संन्यासी देख ।
तरी ते सुकृत । तितुकेचि जोडे ॥४॥
तैसे सहस्त्र संन्यासी । गणित एक परमहंसी ।
पाहता सुकृतांसी । एक तृप्त केलिया ॥५॥
परमहंसी सहस्त्रगणी । तैसीच ब्रह्माज्ञानाची मांडणी ।
जोडे सुकृत तृप्त करणी । एक ब्रह्मवेत्ता ॥६॥
उपमा देता ब्रह्मवेत्यासी । पाहता ब्रह्माडी नाही त्यासी ।
तृप्त केलिया ब्रह्मवेत्यासी । हरिहर तृप्त ॥७॥
ऐसे वेत्ते अपरंपार । न ये नामधारका बरोबर ।
नामधारका सादर । पाहे एका जनार्दनी ॥८॥

अर्थ :
नामधारकाचे किती महत्व असते ते नाथबाबा आपल्याला सांगतात.
१) खेड़ेगावाकडील एक हजार ब्राम्हण यांस तृप्त भोजन दिल्याचे जे सुकृत्य पुण्यक्षेत्रीच्या एका ब्राम्हणास घडते.
२)पुण्यक्षेत्रीचे असे दश शतक ब्राम्हण तृप्त केल्यास एका पाठकाचे सुकृत घडते.
३) असे हजार वेद पाठक तृप्त केल्यास एक पंडित तृप्त केल्याचे सुकृत घडते.
४) तसे सहस्र पंडित भोजन तृप्त केल्यास एक संन्यासी तृप्त केल्याचे सुकृत घडते.
५) तैसे हजार सन्यासी त्यांची गणती एका परमहंस तृप्त केल्याचे सुकृत घडते.
६) परमहंस हजार गणले तर एका ब्रम्हज्ञानाची मांडणी होते. त्यांस एक ब्रम्हवेत्ता तृप्त केल्याचे सुकृत घडते.
७) उपमा ब्रम्हवेत्त्याची देता ब्रम्हांडात असा नाही पण त्यांस तृप्त केलेत तर भगवान हरिहर देखील तृप्त होतात.
८) ऐसे अपरंपार वेत्ते । नये नामधारका बरोबर । नामधारका सादर । पाहे एकाजनार्दनी ॥
असा नामधारकांचा महिमा आहे नाथबाबांनी किती अगणित पुण्यलाभ होईल असे यातून सांगितले आहे मग आपणही तसे नाम घ्यायला नामधारक व्हायला काही हरकत नाही.
श्रावनातील पुण्यकाळ आणि चातुर्मास देखील अगदी दुग्धशर्करा योग आहे.
नाथबाबा हे देखील सांगतात.
*अष्टादश पुराणे सांगती बडिवार । नाम साराचे सार कलीयुगी ॥*
नामधारकाचा अधिकार श्रेष्ठता अभंग समाप्त

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग