वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › ११. संत संग महिमा अभंग

संत संग महिमा अभंग

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073481 · अभंग क्र. १

1.
संत संग महिमा अभंग
संतसंगे हरे पाप । संतसंगे निरसे ताप ।
संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्र्चळ ॥१॥
संतसंगे वैराग्य घडे । संतसंगे विरक्ती जोडे ।
संतसंगे निजशांति वाढे । साधन हृदयी अखंडीत ॥२॥
संत संगे हरिची भक्ति । संतसंगे ज्ञान विरक्ती ।
संतसंगे भुक्ती मुक्ती । साधका वरिती अनायसे ॥३॥
निळा म्हणे साधु संत । महाभाग्याचे हे भाग्य ।
सेविती ते स्वरुप चांग । पार्वती आत्मया श्रीहरिचे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग