दत्त जन्माचे अभंग प्
1.
दत्त जन्माचे अभंग प्रारंभ
पैलमेरुच्या शिखरी । एक योगी निराकारी ।
मुद्रा लावुनि खेंचरी । तो ब्रम्हपदी बैसल ॥१॥
तेणे सांडियेली माया । त्याजिलेली कथा काया ।
मन गेले विलया । ब्रम्हानंदा माझारी ॥२॥
अनुहत ध्वनि नाद । तो पावला परमपद ।
उन्मनी तुर्या विनोदे । छंदे छंदे डोलतुसे ॥३॥
ज्ञान गोदावरीच्या तीरी । स्नान केले पांचाळेश्वरी ।
ज्ञानदेवाच्या अंतरी । दत्तात्रेय योगिया ॥४॥
