वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › १६. उलटी खूण भारुड

उलटी खूण भारुड

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073517 · अभंग क्र. १

1.
उलटी खूण भारुड
नाथाच्या घरची उलटी खूण ।
पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी ।
पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले ।
वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले ।
राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला ।
बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा ।
जो तो गुरुचा बेटा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग