हमामा घाली बाळा । सा
1.
हमामा घाली बाळा । सांडी खोटा चाळा ।
फोडीन तुझा टाळा । वाकुल्या दाविन काळा ॥१॥
हमामारे पोरा हमामा रे ॥२॥
हमामा घाली बारे । अंगी भरले वारे ।
चाखती पिकली चारे ॥जाऊ वरिल्या द्वारेंरे पोरा ॥३॥
हमामा घाली नेटे । सांडी बोलणे खोटे ॥
आता जासिल कोठे । कान्होबाचे बळ मोठे रे पोरा ॥४॥
हमामा घाली सोई ॥भांभाळी सवा दोही ॥
एक नेमे तू राही । तेथे बहु सुख पाहीरे पोरा ॥५॥
हमामियाचा नादु वाजे ॥अनुहाते कोपर गाजे ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल राजे । रत्नजडित मुगुट साजेरे पोरा ॥६॥
