वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › १. प्रारब्ध पर अभंग

जे जे असेल प्रारब्धी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073425 · अभंग क्र. १

1.
जे जे असेल प्रारब्धी । ते न चुके कर्मकधी ।
होणार्‍या सारिखी बुद्धी । कर्मरेषा प्रगटे ॥१॥
न कळे पुढील होणार । भूत भविष्य हा विचार ।
कर्म धर्म तदनुसार । भोगणे लागे सर्वर्था ॥२॥
ऐसा लिहुनि गेला विधाता । मग कासया कारावी ते चिंता ।
आपुलीया संचिता । कर्मरेषा प्रमाण ॥३॥
जैसे असेल आचरण । घडले असेल पाप पुण्य ।
तैसे सानुकुल होतील कर्म । मान अपमान जन करित ॥४॥
काळ अनुकुल अथवा प्रतिकूल । परि सोडू नये आपुले धैर्यबळ ।
नाचारी मन केवळ । नये बाटवू सर्वथा ॥५॥
अखंड वाणी हरिस्मरणी । सुखी विश्रांती कीर्तनी ।
खेचर विसोबा म्हणे प्राणी । मनुष्य देह दुर्लभ ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग