वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › ७. शिमगा भारुड

शिमगा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073507 · अभंग क्र. १

1.
शिमगा
सत्त्व गांठी उमगा । तेणे सफळ होईल शिमगा ।
तुम्ही हेच गाणे गा । तुम्ही हसू नका हसू नका ॥१॥
भूत सभेची कारटी । विषय गोवऱ्या चोरटी ।
उतरा कुकर्माची राहाटी । तुम्ही हसू नका हसू नका ॥२॥
जागोजागी थांबा । अवघ्या मिळोनि मारा बोंबा ।
न जळे एरंडाच्या कोंबा । तुम्ही हसू नका हसू नका ॥३॥
गांवचा पाटील कोळी । काळोबाची पिकली पोळी ।
तुमची पाजळू द्या होळी । तुम्ही हसू नका हसू नका ॥४॥
ओटीत घेउनि गुलाल । सख्या मेहुणीसंगे भुलाल ।
तिचा नवरा मोठा जलाल । तुम्ही हसू नका हसू नका ॥५॥
एका जनार्दनी पोस्त । गाणे गाता हालमस्त ।
नाही तर भडवे समस्त । तुम्ही हसू नका हसू नका ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग