वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 3. मंगळवार चे अभंग

चौक भरियेला आसनी पाच

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073624 · अभंग क्र. १

1.
चौक भरियेला आसनी पाचारिली कुळस्वामिनी ।
वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे ।
तुझे श्रीमुख साजिरे ते मी केधवा देखेन ॥धृ॥
रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ।
अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥
मन मारोनिया मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी ।
भक्तिभाव नैवेद्य ताटी । भरोनि केला हाकारा ॥३॥
डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे ।
आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करी तुकयासी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग