हनुमान जन्माचे अभंग
1.
हनुमान जन्माचे अभंग प्रारंभ
देवांगना हाती आणविला शृंगी । यज्ञ तो प्रसंगी आंरभिला ॥१॥
विभांडका क्रोध आला असे भारी । अयोध्या भीतरी वेगी आला ॥२॥
राजा दशरथ सामोरा जाऊनी । अति प्रिती करुनी सभे नेला ॥३॥
पुत्र स्नुषा दोन्ही देखता नयनी । आनंदला मनी म्हणे नामा ॥४॥
