पहिले कोठेच नव्हते क
1.
पहिले कोठेच नव्हते कांही । चंद्र सूर्य तारा नाही ।
अवघे शून्यच होते पाही । कान्होबा ते रे ते रे ते ॥१॥
तेथे एक ढालगज निर्माण झाली । तिने पहा एवढी ख्याती केली ।
इंद्रादिकांस म्हणे बाहुली । अमरपुरी तिची घरकुली । ॥२॥
ती मूळची कर्णकुमारी । तिचा बाप तो ब्रह्मचारी ।
तो जन्मला तियेचे उदरी । ऐसी पाहता नवलपरी ॥३॥
तिने बापचि दादला केला । कोण वाईट म्हणे या बोला ।
अवघे तिच्याच बोलाने चाला । तरी कैवल्यसुख तुम्हाला ॥४॥
तो तियेसी शिवला नाही । वांझ गर्भिण झाली पाही ।
व्याली पांच पंचवीस पोरे तीही । ऐसे तियेचे नवल पाही ॥५॥
ऐशी व्याली ते सकळ सृष्टी । न पडता भ्रताराचे दृष्टी ।
एकाजनार्दनी या गोष्टी । विचारा सद्गुरुच्या मुखी ॥६॥
कान्होबा अभंग समाप्त
