वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 15. रूपके › २४. गोंधळ भारुड

गोंधळ भारुड

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073511 · अभंग क्र. १

1.
गोंधळ भारुड
माझे कुळींची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासिनी । ठेविले दोनी कर जघनी ।
उभी सखीसजनी ॥१॥
येई पुंडलीक वरदायिनी । विश्वजननी । रंगा येई वो ॥धृ. ॥
मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधिले ।
ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले ।
धूप दाविले । सुवासे करुनी ॥२॥
सभामंडप शोभला । भक्ति चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला । रंग माजला ।
वेद बोलिला । मूळचा ध्वनी ॥३॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेउनी संबळी ।
गाती हरीची नामावळी । मातले बळी ।
प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥४॥
ऐसा गोंधळ घातीला । भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनी भला । ऐक्य साधिला । ठाव आपुला ।
लाभ त्रिभुवनी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग