सुकुमार सुरस परिमळे
263.
सुकुमार सुरस परिमळे अगाध ।
तयाचा सुखबोध सेवी आधी ॥
मना मारी सुबुध्दी तल्लीन मकरंदी ।
विषय उपाधी टाकी रया ॥
रखुमादेविवरु गुणाचा सुरवाडु ।
मनबुध्दि निवाडु राजहंसु ॥
अर्थ :
सुकुमार, सुरस असा परिमळ अगाध आहे. तेंव्हा त्याचा सुखोपभोग आधी घेऊ. मनाला मारुन मिळालेला सुबुध्दीरुप मकरंदाचा स्वाद घेताना विषय व उपाधी टाकुन देऊ. रखुमाईचे पती श्री विठ्ठल हे गुणांची खाणी असुन ते मन व बुध्दी निवडुन घेणारे जणुकाही राजहंस आहेत असे माऊली सांगतात.
