वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

कृष्ण डोलतु रांगतु र

🙏 4. संत नामदेव · ABH-083024 · अभंग क्र. २६०

260.
कृष्ण डोलतु रांगतु रंगणी | इडापीडा धांबोनि घेती गौळणी ॥१॥
जीवापरीस हे वाल्हे बालक | शिणलिया विसांवा त्याचे श्रीमुख ॥२॥
सर्व सुख याचेनी मनोहरे | तेंचि खेळविता धणी त पुरे ॥३॥
देह गेह नाठवे सर्वथा | सुतपतीची मावळली वार्ता ॥४॥
सुख न सांगवे वैखरी कोंदिली | रूपी रमता मने बुडी दिधली ॥५॥
नामया स्वामी सुखाचा सागरू | कृष्ण खेळविंता सुफळ हा संसारू ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग