आंगा आणुनि वारे पोरा
260.
आंगा आणुनि वारे पोरा घालिसि हमामा ।
निघोनिया जाईल पुढे पडासे येऊनि दमा ॥१॥
घुमे एक्याभावे ।
हा गोपाळ घेउनि सवे ॥२॥
तोंडा येतो फेंस पुटिला नाचसिल बा रे ।
पडता निसतोश मग हासतिल पोरे ॥३॥
निळा म्हणे सकळही सोडुनिया तमा ।
एका हरिविण तया नांव हमामा ॥४॥
