निर्विकल्प जया समाधी
266.
निर्विकल्प जया समाधी जोडली ।
चित्तासी अमोली परब्रह्मी ॥१॥
तोचि एक खरा ब्राह्मण वेदार्थे ।
आणिक ती मते पाखंडाची ॥२॥
सर्वाभूती एक आत्मा देखियेला ।
शांतीचा वोतिला मूर्तिमंत ॥३॥
बहेणि म्हणे जैसे आकाश सर्वत्र ।
तैसा तो एकत्र जगामाजी ॥४॥
