जन्ममरणाची विसरलो चि
259.
जन्ममरणाची विसरलो चिंता । तू माझा अनंता माय बाप ॥१॥
होतील डोळा पाहेन प्रकार । भय आणि भर निसरली ॥२॥
लीगाडाचे मुळे होती पंच भूते । ज्यांचे त्या पुरते विभाविले ॥३॥
तुका म्हणे झाला प्रपंच पारिखा । जीवांसी तू सखा पांडुरंगा ॥४॥
