वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 125. गौळणी

चाल सखिये वेगु करी व

🙏 4. संत नामदेव · ABH-083043 · अभंग क्र. २६१

261.
चाल सखिये वेगु करी वहिला | दिन सरला काळ थोडा उरला ॥१॥
आवडी घेऊ गे हरिसुख धनीचे | आर्त पुरोनी जे उरलेसे मनीचे ॥२॥
कृष्णमुख पाहे दृष्टी भरोनी | चित्त सांडी कृरवंडी करोनी ॥३॥
झणी विसरसी हे खूण निश्‍ती | मग अंतरले सवसुख पुढती ॥४॥
हाचि निर्धार करूनिया मानसी | आंत बाहेरी हरिरुप देखसी ॥५॥
नामया स्वामी राजीवलोचनु | रमारमणु तो जीवींचा जीवनु ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग