वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 39. काला - अभंग २३२ ते २६३

काळे गोरे एकापुढें ए

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084750 · अभंग क्र. २५९

259.
काळे गोरे एकापुढें एक । धांवताती बिदो बिदीं देख ।
अलक्ष लक्ष्या नये सम्यक । तो नंदनंदन त्रिभुवननायक गे माय ॥१॥
गाईवत्स नेताती वनां । गोपाळ म्हणती अरे कान्हा ।
जो नये वेदा अनुमाना । ज्यासी चतुरानन ध्यानीं ध्यातसे ॥२॥
जे योगिजनांचे ध्येय ध्यान । ज्याकरणें अष्टांग योगसाधन ।
तयांसि नोहे कधी दृश्यमान । तो गौळ्यांचें उच्छिष्ट खाय जाण गे माय ॥३॥
एका जनार्दनी व्यापक । सर्वा ठायी समसमान देख ।
अरिमित्रां देणे ज्यांचे एक । तो हा नायक वैकुठींचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग