वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ९. उपदेश

माकडाचे परी हालविती

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075469 · अभंग क्र. २६१

261.
माकडाचे परी हालविती मान । दावी थोरपण जगामध्ये ॥१॥
स्वहिता मुकले स्वहिता मुकले । बळे झाकी डोळे नाक धरी ॥२॥
माळा आणि मुद्रा दाविताती सोंग । डोलविती अंग रंग नाही ॥३॥
पोटाचा पोसणा विटंबना करी । भीक दारोदारी मागतसे ॥४॥
चोखा म्हणे ऐसा जगामध्ये भोंदु । तया कोण साधु म्हणे देवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग