हाती घेऊनिया काठी |
262.
हाती घेऊनिया काठी | शिकविते श्रीपती |यमुनेंची माती | खासी कांकांकाँ का ॥१॥
हरी तू खोडी नको करू | माझ्या वा वा बा बा ॥ध्रु ॥
धांऊनिया धरिला करी | बैसविला मांडीवरी |मुख पसरोनि करी | आ आ आ आ ॥२॥
विष्णदास नामा म्हणे | मरोतनिया जन्मा येणे |कृष्ण सनातन पाहू | या या या या ॥३॥
